अलीकडेच प्रदर्शित झालेल्या स्वर्गीय वि.दा. सावरकर यांच्या जीवन प्रवासावर आधारीत चित्रपट "स्वातंत्रवीर सावरकर" याचा मोफत शो काल दि. 5 /4 / 2024 शुक्रवार रोजी युनायटेड वुई स्टँड फाउंडेशन या संस्थेने संस्थेतील सदस्यांच्या कुटुंबीयांसाठी त्रिमूर्ती चौक येथील दिव्या ॲडलॅब येथे आयोजित केला . चित्रपटाच्या वेळी स्वतः चित्रपटाचे निर्माता आणि अभिनेते रणदीप हुड्डा यांनी हजेरी लावत प्रेक्षकांना एक सुखद धक्का दिला. युनायटेड वुई स्टँड फाउंडेशन च्या सदस्यांनी औक्षण करत आणि फेटा बाधून त्यांचे स्वागत केले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर मटाले यांनी शालश्रीफल आणि संस्थेतर्फे स्वलिखित पत्र आणि फ्रेम देत त्यांचे आभार मानले. चित्रपट संपताच हुड्डा यांनी मंचावर येतं उपस्थित प्रेक्षकांसोबत संवाद साधत शिवविचार आणि सावरकरांचे विचार लक्षात घेता त्यांना प्रेरणास्थान मानून निर्भिड पने त्यावर अंमबजावणी करून आपण देशसेवेसाठी आपले पुरेपूर योगदान कसे देऊ शकू तशेच तरुणाईने जास्तीतजास्त मेहनत घेत देशाचं नावं जगाच्या कानाकोपऱ्यात कसं पोहोचवाव यावर नवयुगलांना प्रोत्साहित केलं. युनायटेड वुई स्टँड संस्था छत्रपति शिवाजी महाराज आणि सावरकर यांचे विचार जनतेच्या मनात बसावे या साठी ते घेत असलेल्या प्रयत्नांना यश आलं असं देखिल हुड्डा म्हणाले. अभिनेता रणदीप हुड्डा यांचे मनोगत संपताच प्रेक्षकांनी हुड्डा यांना आम्हाला असेच चित्रपट पाहायला आवडतील असे सांगत त्यांच्या अभिनयाचे आणि जिद्दीचे कौतुक केले. अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या अचानक भेटीमुळे जनतेत आनंदाची लहर पाहण्यात आली तसेच लोकांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्या साठी देखिल गर्दी केली आणि जनतेच हे प्रेम पाहून हुड्डा देखिल भाऊक झाले, त्यांनीं आपण नाशिक ला भविष्यात परत येऊ असा शब्द देत प्रेक्षकांचा निरोप घेतला, सर्वत्र देशप्रेमाची लहर आणि तरुणाईत उत्साह पाहण्यात आला. सर्वांचे आभार मानत सागर मटाले यांनी कार्यक्रमाची सांगता केली